Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

समाज या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहे की नाही.. की फक्त सुशांतसिग राजपूत आत्महत्या प्रकरणाचीच चर्चा करणार: मंत्री हसन मुश्रीफ

schedule04 Aug 20 person by visibility 277 categoryराजकारण

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:

महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ? की अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले असून या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस, अंगणवाडी व आशा सेविका, ग्रामीण भागातील योद्धे, खाजगी दवाखाने या सर्वांनी अविरत व अविश्रांत मेहनत घेतली. अद्याप हा धोका कधी जाणार याची खात्री नसताना, ते संघर्ष करत आहेत. जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी मला सांगत होते की, रात्रंदिवस आम्हांला झोप नाही. एखादा फोन आला की, पोटात धस्स होते. या सर्वांवर ईतका तणाव आहे.

राज्यातील या योध्दाचे कौतुक करत, कोरोनाचा शेवट होईपर्यंत त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असताना, दिवसेंदिवस रुग्णांच्या व मयतांच्या संख्येत वाढ असताना या उपायावर चर्चा करण्याऐवजी या संकटामुळे अनेक संसार उघड्यावर आले. अनेकांच्या संसाराचा चक्काचूर झाला. छोटे - छोटे व्यापारी, सलूनवाले, वडाप, रिक्षा, हॉटेल व्यवसायीक, शेतकरी, जिम, मॉल किती कोटी लोक संकटामध्ये सापडेल त्यांना आपण काय मदत करणार ? अनेक तरुण, तरुणी आपल्या जोडीदाराची स्वप्ने पाहिली असतील ? लग्न करण्यास बंदी, पंचवीस माणसे एकत्र जमवायची नाही. किती स्वप्ने पाहिली असतील त्यांनी. ही चर्चा नाही. हे संकट कसले ? या रोगामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी बंदी. पतीच्या निधनानंतर पत्नी, मुले, पत्नीच्या निधनानंतर पती, मुले, नातेवाईक उपस्थित राहू शकत नाहीत. दुसरे सगेसोयरे नसलेले लोक आपल्या जीवन उधारकावर अंत्यसंस्कार करत आहेत. अशी कशी परमेश्वराने परिस्थिती निर्माण केली? यावर लस, औषध निर्माण होने महत्वाचे, चांगल्या बातम्या येत आहेत. 2020 नंतरचे समृद्ध गतजीवन प्राप्त झाले पाहिजे. यासर्व विचारांच्या ऐवजीं गेले दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांतसिग राजपूत यांच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. आत्महत्या का केली ? कशासाठी केली ? त्याचे किती तरुणींच्यावर प्रेम होते ? तो जीवनात यशस्वी झाला की नाही ? या सगळ्याची चौकशी होईल. त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत.

जेव्हा अमृतावहिनी अवतरतात

कोरोना महामारीबाबत साधे एक अवाक्षरही न काढणाऱ्या आमच्यां अमृतावहीनी अवतरतात व एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात. हे आश्चर्यजनक आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची वक्तव्ये, भिंतीवर नामदार उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहिलेली वाक्ये, नामदार आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलीसावर दाखविलेला अविश्वास. हे सर्व वाचून कोरोनाच्या संकटामध्ये नेमकं हे चाललंय तरी काय ? हेच समजत नाही.

लढाई संपली नसली तरी अंतिम टप्पा दृष्टिक्षेपात......

रशियाने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधित लस दृष्टिक्षेपात आली असल्याने एक आशेचा किरण दिसत आहे. त्याचबरोबर आमचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी नुकतीच सिरम इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेस भेट दिल्याची बातमी वाचली. ज्याअर्थी पवार साहेब स्वतः सिरम इन्स्टिट्यूट मध्ये गेले. त्याअर्थी सिरम इन्स्टिट्यूटमधून भारतासह रशिया व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, असा आशावादही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes