केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
schedule02 Aug 20 person by visibility 269 categoryराजकारण
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे .माझी तब्येत चांगली आहे .डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे .गेल्या काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी स्वतःआयसोलेटेड व्हावे आणि आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी ,असे आवाहनही त्यांनी केले आहे