Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

लढा कोरोनाशी : वडणगे पॅटर्नमध्ये कोरोना पेशंटवर घरी उपचार सुरुवात

schedule31 Jul 20 person by visibility 297 categoryआरोग्य

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:

सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर घरीच उपचार या वडणगे पॅटर्न च्या कामाला शुक्रवारी 31 जुलै ला सकाळी प्रत्यक्ष प्रारंभ झाला.गावातील एका कॉलनीत राहणाऱ्या या पेशंटला कोरोनाची बाधा झाल्यावर शिंगणापूर येथील कोविड केअर सेन्टर मध्ये पाठविले होते. त्या ठिकाणी शासकीय डॉक्टरनी तपासणी करून या पेशंटला लक्षणे नसल्याने हा पेशंट गृह अलगिकरणात  ठेवता येईल असे सांगितले. या पेशंटच्या घरी त्यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, असे पत्र ग्रामपंचायतने कोविड केअरला दिल्यावर पेशंटला घरी राहण्याची परवानगी देण्यात आली.

या पेशंटचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामपंचायत,कोरोना समिती सदस्य यांनी या पेशंटच्या कॉलनीत जाऊन त्या पेशंटला आणि नातेवाईकांशी घराबाहेरून संवाद साधला. या घरी पेशंट वरील मजल्यावर स्वतंत्र रुममध्ये राहणार आहे तर त्यांच्या कुटूंबातील दोन सदस्य खालील खोलीमध्ये रहाणार आहेत. त्यांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल शासनाने दिलेली नियमावली त्यांना देण्यात आली.त्यामध्ये पेशंटने कोणती काळजी घ्यावी ,घरच्यांनी कोणती काळजी घ्यावी या सूचना आहेत.

सरपंच सचिन चौगले यांनी पेशंटच्या नातेवाईकाकडे ग्रामपंचायत कडून दिलेले किट दिले.यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मोमीटर,औषधे, ड्रायफूट, पनीर, आयुर्वेदिक काढा साहित्य, वाफ घेण्यासाठी निलगिरी तेल देण्यात आले.तसेच डॉ.संदिप पाटील यांनी तयार केलेले पेशंटचे दिवसभराचे वेळापत्रक देण्यात आले.यामध्ये डायटिशनच्या मार्गदर्शनाखाली केलेला डायट प्लॅन, योगा ,ध्यान ,हलका व्यायाम तसेच वाफ घेण्याचा, आयुर्वेदिक काढा घेण्याच्या वेळा याचा समावेश आहे.

 आवश्यक त्या सर्व सोई आणि प्रशासनाची योग्य ती मदत व मार्गदर्शन या माध्यमातून डॉ. संदीप पाटील, तसेच गावातील सिनियर डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक खाजगी डॉक्टर श्री. डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या पेशंटची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे  तपासणी करणार आहेत .  सोशल कनेक्ट तर्फे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी काढा करण्याचे साहित्य, ड्रायफुट , नाचणी सत्व हे साहित्य पेशंटला दिले   सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, युवा  नेते बाजीराव पाटील, रविंद्र पाटील, राजू पोवार, महालिंग लांडगे, अमर  टिटवे, ग्रामविकास अधिकारी बागूल यांच्यासह कोरोना दक्षता समिती, ग्रा. पं. सदस्य, वैद्यकीय, प्रशासकीय व ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनीच रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ देऊन धीर दिला... अशा प्रकारे राज्यभर चर्चेत असलेला वडणगे पॅटर्न प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात झाली आहे. अंमलात आला...

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes