जगातून नऊ डिसेंबर पर्यंत तर 26 जुलै पर्यंत भारत कोरोनामुक्त होईल; सिंगापूरच्या संशोधकांचा दावा
schedule28 Apr 20 person by visibility 592 categoryतंत्रज्ञान
नवी दिल्ली: जगभर कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. या रोगाच्या रुग्णांची तसेच मृतांची ही संख्या वाढत आहे. असे असताना सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी अँड डिझाईन युनिव्हर्सिटीच्या संशोधका मोठा दिलासा देणारे संशोधन केले आहे. या संशोधकांच्या मतानुसार नऊडिसेंबरपर्यंत कोरोना जगातून जाईल. भारत 26 जुलैपर्यंत कोरोना मुक्त होईल, असा या संशोधकांचा दावा आहे.
या संशोधकानी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून डेटाद्वारे ही शक्यता व्यक्त केली आहे. या संशोधकांच्या मते भारत 26 जुलै पर्यंत कोरोना मुक्त होण्याची शक्यता आहे. या संशोधनानुसार जगातील सर्व देशातून डिसेंबरच्या सुरुवातीस पूर्णपणे कोरोना निघून जाईल. कोरोना अमेरिकेत 27 ऑगस्टमध्ये,स्पेनमध्ये सात ऑगस्ट व इटलीमध्ये 25 ऑगस्ट व भारतात 26 जुलैपर्यंत संपेल. प्रत्येक देशातील हवामान आणि तेथील कोरोनाची स्थिती, मृत्यूची संख्या व बरे झालेले रुग्ण संख्या याआधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार भारत कोरोनामुक्त होण्याची सुरुवात 22 मे पासून होईल. यादरम्यान 97% संक्रमण कमी होईल. तसेच एक जून पर्यंत 99% आणि 26 जुलै पर्यंत भारत 100% कोरोना मुक्त होईल, असा दावा या संशोधकांनी केला आहे.