करोना व्हायरसवर लस सापडल्याचा इटलीने केला दावा
schedule07 May 20 person by visibility 378 categoryनवनिर्मिती
मिलाण: इस्राइल पाठोपाठ आता करोना व्हायरसवर लस सापडल्याचा दावा इटलीनेही केला आहे. इटलीचा दावा खरा ठरला तर जगभरातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असू शकतो. ही लस शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित करून करोना व्हायरसचा खात्मा करत असल्याचा दावा इटलीकडून करण्यात आला आहे.
करोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ३.५ लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, करोना व्हायरच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छता पाळणं अधिक महत्त्वाचं आहे. यासाठी हात वारंवार धुणे, घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे. यासंदर्भातील सूचना सरकार तसंच आरोग्य केंद्रांकडून नागरिकांना वारंवार दिल्या जात आहेत.