जनतारा विद्यामंदिराचा १०० टक्के तर बळवंतराव झेले हायस्कूलचा ९४.१४ टक्के इतका निकाल
schedule29 Jul 20 person by visibility 405 categoryशिक्षण
जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिराचा १०० टक्के तर बळवंतराव झेले हायस्कूलचा ९४.१४ टक्के इतका निकाल लागला आहे.
जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिराचे परीक्षा देलेले १७० विद्यार्थी होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झत्तले. यामध्ये राजवर्धन संतोष कदम याने ९८.८० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रज्ञा सचिन मादनाईक हिने ९८.२० % गुणांसह द्वितीय क्रमांक व अनुष्का गौतम होरे हिने ९८.००% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ९० % पेक्षा जास्त गुण मिळवणारे ६० विद्यार्थी आणि ७५ % पेक्षा जास्त गुण मिळवणारे ५७ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये ३६ विद्यार्थी व द्वितीय श्रेणी मध्ये १७ विद्यार्थी आहेत. तसेच संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारे २१ विद्यार्थी आहेत.
जनतारा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील, नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर, देमापुरे प्राथमिक शाळेचे चेअरमन धनपाल देमापुरे, शिखरे शिशु विकास मंदिरचे चेअरमन डॉ. बी. ए. शिखरे व सर्व कमिटी सदस्यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक वाडकर, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
बळवंतराव झेले हायस्कूलचे २०५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. यातील १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साहिल संजीव चौगुले ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम, तेजस राजकुमार लींबीकाई याने ९६.६० टक्के गुण मिळवून व्दितीय, तर श्रावणी निलेश दिवटे हिने ९६.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. साहिल चौगुले, तेजस लींबीकाई, श्रावणी दिवटे व गायत्री हनीमनाळे या चार विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.
या विद्यार्थ्यांना शाळ समितीचे राजेंद्र धनपाल झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, अदिनाथ होसकल्ले, एफ. वाय. कुंभोजकर, मुख्याध्यापक डी. पी. पाटील, व्ही. ई व्हावळ, सौ. बी. ए. कोगनोळे, एस. जी. लोंढे यांच्यासह सर्व शिक्षक पालकांचे मार्गदर्शन लाभले.