जयसिंगपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य सर्वेक्षण
schedule02 Aug 20 person by visibility 220 categoryइतर
जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी: जयसिंगपूर पालिका आणि आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राजीव गांधीनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले. तर आज बाधित रुग्ण सापडलेल्या ५२ झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू केले.
सर्वेक्षण सुरू असलेल्या परिसरात जाऊन पथकातील सदस्य या विभागातील नागरिकांना भेटून माहिती घेत आहेत. सर्वेक्षणाबाबत पथकामधील कर्मचार्यांना प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडूरंग खटावकर, नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बंडगर, सर्जेराव पवार, बजरंग खामकर, सौ. अनुराधा आडके, महेश कलकुटगी, अर्जुन देशमुख, कल्याणसिंग रजपूत, सुभाष मुरगुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.