Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू

schedule31 Jul 20 person by visibility 244 categoryआरोग्य

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:

कोरोना रूग्णांच्या संखेत जयसिंगपूर शहर व परिसरात होत असलेल्या वाढीमुळे  शासनाच्या आरोग्य विभाग व जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली,

 त्यांनी सांगितले की गुरुवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद दातार, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.पांडुरंग खटावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, यांच्यासह जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने उपनगराध्यक्ष व सर्व संबंधितांची बैठक घेऊन शहराच्या सर्व भागात तातडीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या, गरज भासल्यास खाजगी डॉक्‍टरांच्या कडून सुद्धा मदत घ्यावी असेही सुचवले होते, याचाच भाग म्हणून आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या आढावा बैठकीनंतर आम्ही मुख्याधिकारी टीना गवळी, तसेच उपस्थित नगरसेवक, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर यांची नियोजनाबाबतची बैठक घेऊन आरोग्य सर्वेक्षण बाबतचे नियोजन गुरुवारीच दिवसभरात पूर्ण केले

संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये येत्या आठवड्याभरात नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील पथकाला  स्थानिक डॉ. सतीश पाटील, डॉ. प्रवीण जैन व डॉ. हिरेमठ या मंडळींनी मी केलेल्या विनंतीवरून दहा तज्ञ लोकांची मदत दिली आहे, सर्वेक्षण करणाऱ्या या पथका मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे हेतूने पी. पी. ई. किट व अन्य उपकरणांची मागणी आम्ही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  यांच्याकडे केली असता त्यांनी तातडीने २५० पी. पी. ई. किट,१५ थर्मल स्कॅनर,१५ पल्स ऑक्सीमायटर तातडीने नगरपरिषदला उपलब्ध करून दिले अशी माहितीही उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली,

मुख्याधिकारी  टीना गवळी यांच्या देखरेखीखाली व जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने काम सुरु केले असून संबंधित आरोग्य सर्वेक्षण पथकाकडून घरोघरी जाऊन संशयित रुग्ण, व्याधीग्रस्त रुग्ण, सर्दी पडसे अशी लक्षणे असणारे रुग्ण या सर्वांची वर्गवारी करून आवश्यक त्या ठिकाणी संशयितांचे तातडीने स्यॅब घेण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes