जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 221 नवे रुग्ण ,एकूण संख्या गेली साडेसहा हजारांच्या घरात
schedule02 Aug 20 person by visibility 237 categoryइतर
कोल्हापूर:द फायर:प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाव्हायरस चा संसर्ग वाढतोच आहे.गेल्या चोवीस तासात 221 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 443 वर गेली आहे.आतापर्यंत या साथीला जिल्ह्यात यात 187 व्यक्ती बळी पडले आहेत.सध्या सुमारे 3339 रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.