Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

--------आणि बघता बघता युवराज सतपालच्या छाताडावर बसला

schedule03 Jun 20 person by visibility 456 categoryक्रिडा

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:(अशोक बळीराम पोवार)

कुस्तीसम्राट पै युवराज पाटील यांनी वयाच्या अवघ्या सोळा- सतराव्या वर्षी महाराष्ट्र केसरी कीताब अतिशय लहान वयात मिळविला होता.   1973ते 1986 हा काळ युवराज पाटील यांनी गाजवून सोडला. 1978 च्या दरम्यान, उत्तरेकडून दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपालसिंग वारंवार कोल्हापूरच्या मल्लांना कोल्हापूरकराना कुस्ती खेळण्यास जाहीर  आव्हान देत होता. संपूर्ण भारतात त्याला कोणीच प्रतिस्पर्घी राहीला नाही. अशा वेळी हे आव्हान कमी वयातील युवराजने स्विकारले आणि एप्रिल 1978साली युवराज आणि सतपाल कुस्ती झाली. युवराजने कुस्ती मारली पण सतपाल आणि त्याचे गुरू हणुमानसिग यानी रडीचा डाव केला. निर्णय अमान्य करून मैदान सोडले आणि दिल्लीत जाऊन पून्हा कोल्हापूरकराना जाहीर आव्हान दिले.

पून्हा हीच कुस्ती सन1981ला कराड मुक्कामी झाली. पून्हा युवराजने कुस्ती मारली.  युवराजच्या चाहात्यानी त्वरित युवराजला उचलून मैदानातच जल्लोश केला. याच संधीचा पुन्हा सतपालने फायदा घेऊन निकाल अमान्य करून पून्हा दिल्लीत जाऊन वारंवार कोल्हापूरच्या पैलवानांना आव्हान  देऊ लागला. ही बाब सर्वच कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागली आणि पून्हा एकदा युवराजने हे आव्हान स्विकारले.

तालीम संघाचे कार्याघ्यक्ष महापौर बळीराम पोवार आणि कोल्हापूरच्या कुस्तीचे भिष्माचार्य बाळ गायकवाड यानी दिल्लीत जाऊन सतपालचे सर्व लाड पुरवत म्हणजे सतनालला एकट्याला पाच लाख रूपये इतके प्रचंड मानधन, दिल्लीतून कोल्हापूर येण्याजाण्यासह पाच लोकाना विमान तिकीट, कोल्हापूरात रहायला इंटरनॅशनल हाॅटेल, दिमतीला अॅम्बेसिटर कार उच्य दर्जाचे खाण पिण इतके लाड पुरवून 11 फेब्रुवारी 1984 ला मैदान ठरल. त्या मैदानाची देशभर अशी जाहिरात झाली. की"भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ल कोन?दख्खनचा युवराज कि उत्तराचा सतपाल  महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे या कुस्तीकडे लक्ष लागून राहिले. कोल्हापूरच्या जनतेनेही ही गोष्ट खूपच मनाला लावून घेतली होती. बाळ गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली युवराजचा मोठा सराव पहाटे तीन वाजल्या पासून सकाळी दहा आणि दुपारी तीन ते सात साजेपर्यत करू लागला. स्वत:बाळ गायकवाड, पै. गणपतराव आंदळकर, पै. पी. जी. पाटील सर घ्यायचे. त्याना लागणारी मदत मुकुंद करजगार यांच्यासारखी अनेक लोक करायची. या कुस्तीच्या प्रेमापोटी अनेक भोळया भाबड्या जनतेने देवाला नवस केले, कौल लावले. इतक मणावर घेतल आणि  सर्वाच्या आशेला युवराजच्या कष्ठाला यश आल. युवराजन तीन वेळा सतपालला वर उचलून आपटले आणि चारी मुंड्या चीत करून सतपालच्या छातीवर बसून त्याच्याकडून हार झाल्याचे वदवून घेतले.

कोल्हापूरच्या जनतेचा आनंद गगणात मावेना. हत्ती आणून युवराज ची मिरवणूक काढली. पण युवराज हत्तीवर बसला नाही. पुढे भारतात युवराजला कोणी बरोबरीचा प्रतिस्पर्घीच राहीला नाही. म्हणून बाळ गायकवाड आणि महापौर बळीराम पोवार यानी पाकीस्तानात संपर्क  करून पाकिस्तानचा मोठा पैलवानशेर ए पाकिस्तान कीताबाचा मानकरी पैलवान आख्तर झारा याच्याशी युवराजची कुस्ती ठरविली पण व्हीसा मिळणे त्याला त्याच्या मानधनाचे पैसै पोहचविणे या सर्व  परवानग्या मिळविण्यात खूप वेळ गेला. दरम्यान तिकडे पाकीस्तानात पै. झारावर विष प्रयोग होउन त्याचे निघन झाले. आणि ही कुस्ती झालीच नाही. अखेर युवराजला कोणी प्रतिस्पर्घीच उरला नाही.  लोकानीच त्याला कुस्तीसम्राट हा कीताब दीला.बारा वर्षापूर्वी कुस्ती  मैदान संपवून परत येताना दोन जूनला कार प्रवासात अपघात होऊन हा कुस्ती सम्राट हे जग सोडून गेला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes