कोकणात अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
schedule16 Jun 20 person by visibility 529 categoryपर्यावरण
मुंबई: द फायर: प्रतिनिधी: मान्सूनची देशात दमदार वाटचाल सुरू आहे. देशाचा जवळ जवळ 60 टक्के भाग मान्सूनने व्यापला आहे. दरम्यान आज 16 जून पासून 18 जून पर्यंत म्हणजे तीन दिवस कोकणात अतिवृष्टीचा तर उर्वरित महाराष्ट्रात धुवांधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येत्या 48 ते 72 तासात राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात 76 ते 100 मिलिमीटर अशी अतिवृष्टी होईल तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व विदर्भात 51 ते 75 मिलिमीटर दरम्यान जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळमध्ये वेळेत दाखल झालेला मान्सून पंधरवड्यात देशाच्या 60 टक्के भागात पोहोचला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, ते अगदी हरियाणापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे.