गुगल ऐकणार नाही आता तुमचं संभाषण
schedule24 Sep 19 person by visibility 460 categoryतंत्रज्ञान
नवी दिल्ली : आता यूजर्स त्यांच्या बोलण्याचा वापर केला जावा की केला जाऊ नये याचा कंट्रोल स्वत:कडे ठेवू शकणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन 'व्हॉइस अँड ऑडियो अॅक्टिव्हिटी' VAA हा पर्याय निवडला तर तुमचा ऑडियो डेटा स्टोअर केला जाणार नाही. त्याशिवाय जुन्या संभाषणाचे ऑडिओही डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
व्हॉइस असिस्टंटच्या माध्यमातून गुगल , अॅपल आणि अॅमेझॉनसारख्या अनेक टेक कंपन्या त्यांच्या व्हॉइस असिस्टंटसोबत होणाऱ्या यूजर्सच्या संभाषणाचा काही भाग ऐकतात असं अलीकडेच उघडकीस आलं होतं. यूजर्सना हे माहीत नसतं की त्यांचं बोलणं आणखी कुणी ऐकतंय. काही यूजर्स यामुळे नाराजही होते. मात्र यामागे कंपन्यांचं उद्दिष्ट आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुधारणा करणं हे होतं. अॅपलने आपला हा कार्यक्रम आधीच बंद केला आहे. आता गुगलनेही आपल्या व्हॉइस असिस्टंटसोबत युजर्सचं बोलणं ऐकणं बंद करण्याची घोषणा केली आहे.