शाहू ग्रुप मार्फत गलवान येथे शहीद झालेल्या जवानांना अभिवादन व भ्याड हल्ल्याबद्दल चीनचा निषेध
schedule04 Aug 20 person by visibility 564 categoryराजकारण
गडहिंग्लज:द फायर:प्रतिनिधी:
भारत व चीन या दोन देशांच्या सीमेवर गलवान खोऱ्यामध्ये भारत मातेचे रक्षण करतेवेळी शहीद झालेल्या 20 जवानांना शाहू ग्रुप मार्फत अभिवादन केले.तसेच या भ्याड हल्ल्याबद्दल चीनचा तीव्र शब्दांत निषेध केला. या आशयाचे गडहिंग्लज,करंबळी (ता.गडहिंग्लज ) मडीलगे वा उत्तूर (ता.आजरा) येथे डिजिटल फलक उभारले.
शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखानाच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे, व शाहू दूध संघाच्या चीफ एक्झिक्युटिव डायरेक्टर सौ. नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी जग कोरोना महामारीच्या संकटाने ग्रासलेले असताना चीनने सीमेवर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. त्याला पाकिस्तान ,नेपाळसारखे देश सहकार्य करीत आहेत. व जागतिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.हे निषेधार्ह आहे. त्याबद्दल चीनसह पाकिस्तान नेपाळ यांचाही तीव्र शब्दात निषेध केला. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दल यांनी चीनला चोख प्रत्यूत्तर दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.तसेच इथून पुढे सुद्धा चीनने अशा कुरापती सुरू ठेवल्यास त्यांना 1962 च्या युद्धा प्रमाणे धूळ चारून शहीद झालेल्या जवानांचे बलिदान सैनिकांकडून वाया जाऊ दिले जाणार नाही. असे गौरवोद्गारमाजी सैनिक सेल संयोजक व जय जवान जय किसानचे कुमार पाटील
यावेळी शहिदांसह सैनिकांप्रती आदरभाव दर्शवित त्यांच्या शौर्याला सलाम करणाऱ्या या देशभक्तीपर उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल शाहू कारखानाच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे, व शाहू दूध संघाच्या चीफ एक्झिक्युटिव डायरेक्टर सौ. नवोदिता घाटगे यांचे आजी माजी सैनिकांसह तमाम नागरीकांच्या वतीने जाहीर अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे तालुका कार्याध्यक्ष प्रितम कापसे तालुका कार्याध्यक्ष,शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, डॉ. बेनिता डायस,तुषार मुरगुडे , आनंद पेडणेकर, मनीष पटेल, राहूल हिडदुगी, सचिन घुगरे, दिगंबर विटेकरी, माजी सैनिक बाळासाहेब पोवार, महादेव चिनगुडे, संतोष देशपांडे,सरपंच प्रवीण माळी,सुभाष इंगळे यांच्यासह आजी माजी सैनिक ,नागरिक उपस्थित होते.