महिलांच्या आरोग्यासाठी जिजाऊ महिला समिती अखंडितपणे कार्यरत राहील : सौ . नवोदिता घाटगे
schedule09 Mar 20 person by visibility 307 categoryमहिला
कोल्हापूर: प्रतिंनिधी: द फायर: महिलांचे आरोग्य जपण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला समिती अखंडितपणे कार्यरत राहील, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्याच्या कार्याध्यक्षा सौ . नवोदिता घाटगे यांनी कागल येथे केले त्या राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित महिला आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुहासिनीदेवी घाटगे होत्या.
जिजाऊ महिला समितीने महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. तसेच कागल शहरातून फक्त महिलांसाठी टु व्हीलर रॅली आयोजित केली होती यामध्ये 50 महिलांनी भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळाला अभिवादन करून ही रॅली कागल शहरातून काढण्यात आली. यावेळी महिलांनी फेटे परिधान केले होते.
यावेळी बोलताना सौ घाटगे पुढे म्हणाल्या ,सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पण महिलांनी आपले आरोग्य जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे, महिलांसाठी राजमाता जिजाऊ महिला समिती विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहे. चालू वर्षी कागल,मुरगुड व उत्तूर येथे महिलांच्यासाठी आरोग्य शिबीरे आयोजित केली आहेत. या शिबिरांचा लाभ घेऊन महिलांनी आपले आरोग्य जपावे महिलांच्या आरोग्यासाठी राजमाता जिजाऊ महिला समिती कायम आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे
राजमाता जिजाऊ महिला समिती, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, स्वास्तिक हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय कागल यांच्यावतीने शिनिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन सौ नवोदिता घाटगे यांनी केले.यावेळी हृदय रोग, कॅन्सर, हिमोग्लोबीन व इतर महिलाविषयक आजारांचे तपासणी करण्यात आली. या शिबिराचा दोनशे महिलांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी डॅा . सुरेश पाटील, डॉ . आसावरी कदम, डॉ . पुनम चौगुले, डॉ . राजश्री पाटील, डॉ . संदीप सावंत, डॅा किरण सावंत, डॉ . गीतांजली परब उपस्थित होते
यावेळी रेवती बरकाळे सुधा कदम , नगरसेविका दिपाली भुरले ,विजया निंबाळकर ,लक्ष्मी सावंत ,तसेच नगरसेविका व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.