सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केली; पोस्टमार्टम रिपोर्टचा अहवाल
schedule15 Jun 20 person by visibility 373 categoryकरमणूकइतर
मुंबई : आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा पोस्टमार्टम रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा आला आहे. डॉक्टरांनी त्याने आत्महत्याच केल्याचे म्हटलं आहे. पोस्ट मार्टेम कूपर रूग्णालयात करण्यात आलं. सुशांत सिंहने स्वत:च गळफास घेतल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.सुशांत सिंह राजपूतच्या शरिरात ड्रग्स किंवा विष होतं की नाही याकरता त्याचे महत्वाचे अवयव जेजे रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रविवारी अचानक सुशांत सिंहच्या निधनाची बातमी समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. जवळपास दुपारी ३.३० च्या सुमारास त्याचं शव कपूर रूग्णालयात आणण्यात आलं.
मुलाच्या आत्महत्येची बातमी एकताच सुशांत सिंहच्या वडिलांना धक्का बसला. त्याचे वडिल आज मुंबईत येणार आहेत. तसेच सुशांत सिंहची बहीण चंदीगढवरून मुंबईत आली आहे. सुशांतवर विलेपार्लेच्या स्मशानभूमीत सायंकाळी 4 वाजता अत्यंतसंस्कार करण्यात येणार आहेत. ३४ वर्षीय सुशांत सिंहच्या जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. याच दरम्यान क्राईम ब्रांचची टीम सुशांत सिंहच्या घराची तपासणी करत आहे. सुशांत सिंह डिप्रेशनमध्ये होता. त्यावर तसे उपचार देखील सुरू होते. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दहा वाजता सुशांत सिंह त्याच्या रूममधून बाहेर आणि ज्यूसचा ग्लास आत घेऊन गेला ते बाहेर आलाच नाही