Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

कोरोना व्हायरस सारखी आपत्ती लक्षात घेऊन यापुढे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी फेसबुक लाईव्ह हे प्रभावी माध्यम: समरजितसिंह घाटगे

schedule05 May 20 person by visibility 510 categoryराजकारणक्रिडा

कागल : द फायर: प्रतिनिधी :

कोरोना व्हायरसचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झालेला आहे. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोणत्याही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावयाचे म्हंटले की  लोकसमूह आणि त्यातून लोकसंपर्क हा आलाच!  यापुढे सर्वच स्पर्धेच्या आयोजननासाठी किंवा विविध खेळाच्या कोचिंग साठी  सोशल मीडियाचे फेसबुक लाईव्ह हे प्रभावी माध्यम आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. ते क्रीडा क्षेत्राचे भवितव्य या विषयावर फेसबुक लाईव्ह वरून आपले विचार व्यक्त करताना बोलत होते.

ते पुढे म्हणाले, निरोगी आयुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती  अत्यंत महत्त्वाची आहे. खेळाडूंच्या अंगातील कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना आपण प्रोत्साहन देत असतो. परंतु भविश्यात कोरोना सारख्या आपतीमुळे  सार्वजनिक ठिकाणी ,लोकांच्या भाऊ गर्दीत ,व क्रीडा शोकिनानांच्या उपस्थित स्पर्धा घेणे अडचणीचे आहे. त्यावर उपाय म्हणून यापुढे पारंपारिक क्रीडा स्पर्धा पध्दतीला  फाटा देऊन त्या कॅमेरा शिवाय आणि लोकांच्या उपस्थितीती शिवाय आयोजित करून त्याचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण केल्यास हजारो क्रीडा शौकीन त्या घरबसल्या पाहू शकतील. ही त्या पाठीमागेची संकल्पना आहे.

त्यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूचें ऑनलाईन अर्ज भरून घेणे, स्पर्धेपूर्वी त्यांची कोविड टेस्ट करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या रहाण्याची-  खाण्याची  स्वतंत्र सोय करणे, आदी बाबी कटाक्षाने पाळाव्या लागतील.  यावर शासनानेही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शासनाने परवानगी दिली तर.....

छ.शाहू जयंती निमित्ताने शाहू कारखान्यामार्फत दरवर्षी मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे  आयोजन केले जाते. शासनाने परवानगी दिली तर स्पर्धेचे  सर्व सोपस्कार ऑनलाईन पूर्ण करून कॅमेरा शिवाय व लोकांच्या गर्दी शिवाय स्पर्धेचे आयोजन करून त्या फेसबुक लाईव्हद्वारे हजारो  क्रीडा शौकिनांना घरबसल्या दाखवण्याचे काम शाहू प्रशासन करेल.

नामवंत खेळाडूंनी ब्रँड अंब्यासिडर बनले पाहिजे

बदलत्या परिस्थितीनुसार क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नामवंत खेळाडूंनी पुढे येऊन नव- नवीन कल्पना आणल्या पाहिजेत.त्या त्या खेळातील तज्ञ खेळाडूंनी ऑनलाईन मार्गदर्शन व टिप्स तसेच रोजच्या आहाराबद्धल मार्गदर्शन केले पाहिजे.प्रसंगी ब्रँड अँम्ब्यासिडर बनले पाहिजे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes