सॅमसंगचा 48MP कॅमेऱ्याचा नवा स्मार्टफोन लाँच
schedule05 Jun 20 person by visibility 382 categoryनवनिर्मिती
नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात नवीन स्मार्टफोन Galaxy A31 लाँच केला आहे. हा फोन २०२० मधील सॅमसंग गॅलेक्सीच्या ए सीरिजमधील तिसरा फोन आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. तसेच 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज केल्यानंतर हा फोनमध्ये २२ तासापर्यंत व्हिडिओ पाहू शकता असा कंपनीचा दावा आहे.
किंमत
भारतात Samsung Galaxy A31 स्मार्टफोन तीन कलरमध्ये ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवरुन खरेदी करता येऊ शकतो.
४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा
फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी प्रेमींसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. हा एफएचडी प्लस रिझॉल्यूशनचा डिस्प्ले आहे.