Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

ऊस उत्पादन वाढीसाठी कांडी लागणीपेक्षा रोप लागवड कराः डॉ अशोक पिसाळ

schedule09 Jun 20 person by visibility 496 categoryकृषीराजकारण

कागल: द फायर:प्रतिनिधी:

ऊस लागवडीसाठी रोप लागण फायदेशीर आहे.त्यामुळे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कांडी लागणीपेक्षा रोप लागवड करा.असे आवाहन कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. अशोक पिसाळ यांनी केले.

कागलच्या श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित आँनलाईन झुम अँपच्या माध्यमातून तिसऱ्या ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते सभासद शेतकऱ्यांशी संवादावेळी बोलत होते.त्यांनी हंगामनिहाय ऊस लागवडीसाठी जातीचे नियोजन व रोप लागणीसाठी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी 200 हुन अधिक ठिकाणांहून 3 हजार सभासद शेतकरी या परिसंवाद मध्ये सहभागी झाले.ऊस रोप लागणीविषयी बोलताना ते म्हणाले,रोप लागणीमुळे बियाणांचा खर्च कमी होतो. पहिल्या दीड महिन्यांतील खर्च वाचतो. उगवण व वाढ एकसारखी होते.तूट पडत नाही.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे म्हणाले, गळीत हंगाम 2020- 21 मध्ये कारखान्याची प्रतिदिनी सात हजार वरून आठ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यात येणार आहे.दहा लाख मे टनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी पिकविलेल्या संपूर्ण उसाची नोंद देऊन गळीतास पाठवावा.तसेच थेट सिरप पासुन इथेनॉल निर्माण करण्याचा प्रकल्प सुद्धा हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर देण्यासाठी फायदा होईल. याशिवाय कारखाना कार्यक्षेत्रातील  महिला सभासदांसाठी अशाच पद्धतीने आँनलाईन पद्धतीने परिसंवादाचे आयोजन कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका व मार्गदर्शिका श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करू.

यावेळी सुनिता कोंडेकर,मंगल संकपाळ, के .बी. चव्हण ,गोविंद साबळे,बाळासो चौगुले ,सागर गायकवाड ,आदी शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढी बाबत प्रश्न विचारले.या ऑनलाईन परिसंवादमध्ये कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका व शाहू ग्रूपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे, यांचेसह व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे यांचेसह सर्व संचालक सहभागी झाले.

कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेती अधिकारी आर एम गंगाई,ऊस विकास अधिकारी के बी पाटील व आय टी मँनेजर सुहास मगदूम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले.आभार संचालक यशवंत माने यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes