माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
schedule05 Aug 20 person by visibility 1034 categoryराजकारण
पुणे:द फायर:प्रतिनिधी: राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 91 वर्षे होते किडनीच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले.14 जुलै रोजी ताप आल्याने त्यांना निलंगा येथून लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले नंतर 16 जुलै रोजी पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता मात्र उपचारानंतर दोनच दिवसापूर्वी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.या वयातही त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र आज पहाटे दोन वाजता किडनीच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले.दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव निलंगा येथे आणले जाणार असून सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
तीन जून 1985 ते 6 मार्च 1986 या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री होते.9 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांचा निलंगा येथे जन्म झाला होता. एम.ए.,एल.एल.बी .शिक्षण झालेले शिवाजीराव पाटील महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक ,राजकीय क्षेत्रात सक्रिय होते .हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.