Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी

schedule05 Aug 20 person by visibility 586 categoryकरमणूक

पाटणाः अखेर बिहार सरकारने अभिनेता सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी सुशांत सिंगचे वडील केके सिंग यांनी पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला आहे. त्याआधारे चौकशी करण्याची अधिकृत विनंती ती गृहमंत्रालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाला केली आहे. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अभिनेत्याच्या प्रकरणी सीबीआय चौकशीची प्रत्येक जण मागणी करत आहे. बिहार विधानसभे विधानसभेतही  हा विषय उपस्थित झाला आणि अनेक आमदारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली .

पाटणा पोलिसांना तपासात मुंबई पोलीस सहकार्य करत नाहीत. त्यामुळे सीबीआय चौकशीला पर्याय नाही. बिहार पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला मुंबईत जबरदस्तीने फॉरेन टाईम केल्याप्रकरणी नितीश कुमार यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली .दरम्यान हे प्रकरण सीबीआय'कडे सुपूर्द करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश माने शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे .रिया चक्रवर्ती आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंग रजपुत याची मैत्रीण आहे .सुशांत सिंगच्या वडील केके सिंग यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत आपल्या मुलाच्या  मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप केला आहे .सतीश माने शिंदे म्हणाले की याप्रकरणी कायदेशीरदृष्ट्या तपास करण्याचा आणि त्यात सहभागी होण्याचा बिहार पोलिसांना कोणताही अधिकार नाही .पाटणा पोलिसाने झिरो एफआयआर नोंदवून तो तपासासाठी मुंबई पोलिसाकडे ट्रान्सफर करायला हवा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes