सुशांत सिंग आत्महत्याःमुंबई पोलिसातील कोणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करते आहे; कुटुंबाच्या वकिलांचा आरोप
schedule30 Jul 20 person by visibility 466 categoryकरमणूक
पाटणाः अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येने चित्रपट सृष्टी हादरली.त्याच्या मृत्यूविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे .असे असताना त्याचे वडील केके सिंग यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती वर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी आरोप केला आहे की, मुंबई पोलीसातील कोणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करत आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना विकास सिंग यांनी सांगितले की, ती सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.तिने तेथे सीबीआय चौकशीची मागणी करणे अपेक्षित होते,पण तिने आपल्या याचिकेत एफआयआर पाटणा येथे नोंदविला असताना तो तपास मुंबई पोलिसाकडे वर्ग करावा,अशी मागणी केली आहे. यापेक्षा वेगळा पुरावा कुठला हवा. मुंबई पोलीसातील कोणीतरी तिला मदत करत आहे. अन्य एका न्यूज चॅनेलशी बोलताना विकास सिंग यांनी दावा केला आहे की, फेब्रुवारीमध्ये सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीत ती त्याला त्रास देत असल्याचे म्हटले होते.सुशांत वाईट लोकांच्या संगतीत असून त्याचे बरेवाईट होऊ शकते असे म्हंटले होते.