'तान्हाजी'ची वाटचाल 150 कोटीकडे !
schedule19 Jan 20 person by visibility 98 categoryकरमणूक
मुंबई : द फायर - प्रतिनिधी
अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा टप्पा पार केला होता. बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाची कमाई येत्या काही दिवसातच १५० कोटीच्या घरात जाईल, असा प्रेक्षकांचा प्रतिसाद सांगतो आहे.
पहिल्या सहा दिवसांत या सिनेमाने ६८ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात त्याने १०० कोटी टप्पा ओलांडला. २०२० सालातील १०० कोटींची कमाई करणारा 'तान्हाजी-द अनसंग वॉरियर' हा पहिलाच चित्रपट ठरला. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट तिकीटबारीवर गर्दी खेचतो आहे. शुक्रवारपर्यंत या चित्रपटाने १२८.९७ कोटींची कमाई केली होती. शुक्रवारी दिवसात १०.०६ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट काल शनिवारी किमान आणखी दहा कोटी वसूल करेल, असा अंदाज आहे. येत्या काही दिवसातच हा चित्रपट १५० कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज आहे. हा चित्रपट हरियाणा व उत्तर प्रदेशात करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सरकारही 'तान्हाजी' करमुक्त करण्याच्या विचारात आहे.