गुरुवार चार जून पर्यंत जिल्ह्यात अधून मधून पाऊस देणार तडाखा
schedule01 Jun 20 person by visibility 305 categoryपर्यावरण
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुरुवार दिनांक चार जून पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. अशीच परिस्थिती सातारा व सांगली जिल्ह्यात राहील. अरबी समुद्रात दक्षिण- पश्चिम व पूर्व मध्यभागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाने कोकण किनार पट्टीला वादळी पावसाचा तडाखा बसेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नंतर गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळेच पश्चिम महाराष्ट्रात 4 जून पर्यंत पावसाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडात होत जोरदार पाऊस होईल. काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस येत्या गुरुवारपर्यंत म्हणजे चार जून पर्यंत जोरदार हजेरी लावेल असा अंदाज आहे.