Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

इचलकरंजीत तंत्रज्ञानी तयार केलं अवघ्या पाच दिवसात व्हेंटिलेटर मशीन

schedule19 Apr 20 person by visibility 302 categoryनवनिर्मिती

इचलकरंजी :द फायर: प्रतिनिधी :

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योजकांनी पुढाकार घेऊन व्हेंटिलेटर व इतर वैद्यकीय उपकरणे बनवण्यास पुढे यावे ,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला इथल्या गणेश क्वालिटी मशीनच्या उद्योजकाने प्रतिसाद दिला आहे. त्यांनी केवळ पाच दिवसात व्हेंटिलेटर तयार केला आहे. अल्प खर्चातील हे उत्पादन अत्यंत उपयुक्त आहे.

 येथील मिलिंद बिरादार, सुभाष तंगडी यांनी या मशीनचे डिझाईन तयार केले आणि सागर पाटील, विनायक पालकर व शिवानंद बिद्री यांच्या सहकार्याने उत्पादन केले. यासाठी त्यांनी पोलिसांची आवश्यक परवानगीही घेतली होती.

शासनाच्या निकषानुसार आणि वैद्यकीय गरजेनुसार व्हेंटिलेटरमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात याची दखल घेत डिझाईन बनवले. यासाठी डॉक्टर सत्यनारायण व डॉक्टर केतकी साखरपे यांच्याकडून वैद्यकीयदृष्ट्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची माहिती घेण्यात आली. या व्हेटिलेटरचे वजन केवळ बारा किलो आहे. ते सहज हाताळता येण्यासारखे आहे. अगदी इस्पितळाच्या जनरल वॉर्ड बरोबरच ऍम्ब्युलन्समध्येही त्याचा वापर करता येणे शक्य आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes