कुस्तीसम्राट पै युवराज पाटील यांच्या स्मृतिस दिला कुस्ती शौकीनांनी उजाळा
schedule03 Jun 20 person by visibility 223 categoryक्रिडा
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: हजारो कुस्ती शौकीनांच्या गळयातील ताईत कुस्तीसम्राट पै युवराज पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्य कुस्ती प्रशिक्षक मुकुंद करजगार यांच्या उघमनगर येथील व्यायाम शाळेत मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुकुंद करजगार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा तालीम संघ सचिव अशोक पोवार, पै संतोष पाटील,पै विजय पाटील, राजू करजगार, जेष्ठ कुस्ती ठेकेदार जामले वस्ताद, बाळासाहेब सुतार, वस्ताद तृषार बागडी, रमेश मोरे आदी मोजके कुस्ती शौकीन उपस्थित होते.
याप्रसंगी पै युवराज पाटील यांच्या कुस्ती क्षेत्रातील स्मृतिना उजाळा देण्यात आला. लॉकडाऊनच्या पाश्व॔भूमिमुळे अतिशय साध्या पद्धतीने स्मृतीदिन साजरा करण्यात आला. दरम्यान लॉकडाऊनमुळे सर्व तालमी बंद आहेत. सर्व पैलवान आपल्याला घरी गावी असल्यामुळे मोतीबाग तालीम येथे तालीम संघाच्यावतीनेही प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी पै दादू चौगले ( ज्यूनियर ),संतोष कामत, रणजित पाटील आदी उपस्थित होते.