भारतीय बाजारपेठेत शाओमीचेच वर्चस्व; ३९ दशलक्ष स्मार्टफोनची विक्री
schedule02 Feb 20 person by visibility 614 categoryतंत्रज्ञान
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत शाओमी या कंपनीचे गेल्या वर्षभरात सर्वाधिक स्मार्टफोन विकले गेले आहेत. भारतीय बाजारात २०१९ मध्ये शाओमी Q4 च्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ झाली असून ३९ दशलक्ष मोबाईलची विक्री झाली आहे. त्यामुळे हे वर्ष शाओमीसाठी फायदेशीर ठरले. २०१९ मध्ये देशात सर्व मोबाईल कंपन्यांनी एकूण १४८ दशलक्ष स्मार्टफोनची विक्रीकेली आहे.
ग्लोबल टेक्नॉलॉजी मार्केटचा आढावा घेणारी संस्था कॅनालीजने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठविषयी एक अहवाल गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. त्यानुसार २०१९ मध्ये भारतीय बाजारात शाओमी Q4 ला सर्वाधिक मागणी आहे. या चायनीज कंपनीने वर्षभरात एकूण ४२.९ दशलक्ष स्मार्टफोन भारतात पाठवले. तर २०१८ मध्ये एकूण ४१ दशलक्ष मोबाईल्स पाठवले होते.
शाओमीनंतर भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी सॅमसंग आहे. सॅमसंगने यावर्षी ३२.३ दशलक्ष स्मार्टफोन विकले. तर २०१८ मध्ये सॅमसंगने एकूण ३५.४ दशलक्ष मोबाईल विकले होते.
विवोने एकूण २४.७ दशलक्ष मोबाईल विकून देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. रिअलमीच्या स्मार्टफोनची विक्रीही चांगली झाली. त्यांचे ४.७ ७ दशलक्ष मोबाईल विकले गेले. पाचव्या स्थानावर ओप्पो आहे. ओप्पोने भारतीय मार्केटमध्ये यावर्षातील ४२ टक्के वृद्धी नोंदवली आहे. २०१९ मध्ये ओप्पोने १६.१ ७ दशलक्ष स्मार्टफोन विकले.